Happenings


19/08/2017
to
30/08/2017

Ranbhajya – Programme for Wild Vegetables of Tribal Area - रानभाज्यामहोत्सव २०१७

गेल्या वर्षी परिवर्तन महिला संस्थेने आयोजित केलेल्या रानभाज्या स्पर्धेला अतिशय उत्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर या वर्षी देखील रानभाज्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी या स्पर्धेला मोखाड्याच्या खेड्यापाड्यातून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला. आमच्या गावात या स्पर्धेचे आयोजन करा अशी मागणी बऱ्याच गावातून संस्थे कडेयेत होती.या रानभाज्याची औषधी महत्व आहेत आणिया माहितीचे जतन व्हावे वलोकांना ते कळावे या उद्देशाने ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या वर्षी ३३ पाड्यातील ९६० महिलांनी यात सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धेच्या वेळेस महिलांनी ३-४ दिवसआधीपासून भाज्या जमवल्या, नवीन नवीन प्रकाराने त्या केल्या, अतिशय सुंदर सजावट केली. प्रत्येक पाड्यावर काहीतरी नवीन पाहायला मिळाले, बघायला मिळाले. सगळी चंगळ चालू होती. भाज्यांची गर्दी, महिलांची गर्दी, बघणाऱ्यांची गर्दी सगळी धम्माल चालू होती गेली 15 दिवस. सहभागी महिलांना डब्ब्याचा सेट देण्यात आला. प्रत्येक पाड्यात पहिला आणि दुसरा नंबर काढण्यात आला. काही ठिकाणी स्पेशल बक्षीसही देण्यात आले. परीक्षकांनाहि कोणाला बक्षीस द्यावे असा प्रश्न पडला. पण परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. कार्यक्रम कुठे करायचा, जज कोण असेल, कितीबक्षीस काढायची, किती महिला सहभागी होतील त्यांची यादी, गावातील मान्यवरांना या उपक्रमात सहभागी करून घेणे आदि सर्वांचे शिस्तबद्ध नियोजन गाव पातळीवर केले होते. यामुळेसगळे कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि सर्वांच्या सहभागातून पार पडले. महिलांची, पाड्यांचीसंख्याअचानक खूप वाढली पण अनेक हात मदतीला धावले आणि या स्पर्धा सुरळीत पार पडल्या.सुधा शहा आणि त्यांच्या WE Asociationof India ग्रुप मधील सहकारी, रोहित दिवान व त्यांचे सहकारी,रोटरीक्लब ऑफ ठाणे सेंट्रल,स्निग्धासबनीस, उदय सबनीस, विजू माने, संदेश राव, सुहास परब, पुष्कर सबनीस, रवी करमरकर, अजित घांगरेकरअश्याअनेक लोकांनी लगेचच मदतीचा हात पुढे केला आणि ह्या स्पर्धा अतिशय आनंदात, उत्साहात भरभरून आलेल्या प्रतिसादातून पार पडले.

Vision of a Society where Every Woman lives with FREEDOM and DIGNITY
Cell: +91-9322217024, Email: info@parivartanmahila.org, jyoti_30@yahoo.com